Wednesday, 9 November 2011

Badal Swikara...

बदल स्वीकारा .... 

         माझ्या लग्नाची गोष्ट खूपच वेगळी आहे. ती सांगणार नाही. शैलजा मोळक यांनी संपादित केलेल्या  'शिवस्पर्श' दिवाळी अंकात ती दिलेली आहे.
         माझे विचार कसे होते व बदलत कसे गेले, हे महत्वाचे आहे. तसा मी लहान असल्यापासून समाजाचा विचार करणारा आहे. शालेय जीवनात समाजसेवेचे खूळ डोक्यात घेवून संपूर्ण शाळेची सफाई करणारा मी विद्यार्थी होतो. इयत्ता तिसरी व चौथी मध्ये महात्मा गांधींसारखा हातात खराटा घेवून तोंडाला कापड बांधून चोविसावाडीतील 'जीवन शिक्षण विद्यामंदिर' या शाळेत समाजसेवेची नकळत सुरवात झाली. मी लहान असलो तरी मोठे विचार स्वीकारत होतो. मोठे स्वप्न पाहत होतो. राहायला घर नसले तरी देशबांधणीचे काम करावे  अशी मनिषा होती.
        मी असा होतो तरीसुद्धा पत्नी नोकरी करणारी नको. ती घर सांभाळणारी हवी. मी आईलाच देव मानतो. मी मातृप्रेमी आहे. यामुळे आईला काहीच काम करायला लागू नये. आपल्या बायकोने आईची व घराची सेवा करावी असा विचार होताच पण जुनाट विचार सुद्धा होता की बायकांनी नोकरी करू नये. त्याची गरज काय ? यामुळे मी शैलजा रंधवे आत्ताची शैलजा मोळक हिला कोर्टाची कायम असलेली  नोकरी सोडायला लावली. माझी अटच ती होती. जर माझ्याशी लग्न  करायचे असेल तर तुला नोकरी सोडावी लागेल. शैलाने नोकरी व मी. यात माझी निवड केली. सरकारी नोकरीला रामराम केला. आमचे लग्न झाले. ती वाडीत माझ्याबरोबर  राहू लागली. पण जसेजसे दिवस जाऊ लागले. तिचे डोक्यावरचे पाणी आणि डोळ्यातील अश्रू  याने माझी कालवाकालव  झाली. घरच्यांना तिची किंमत कळलीच नाही. तिची नोकरी सोडून काहीच उपयोग झाला नव्हता. परिस्थिती बिकट आली होती. यामुळे तिला सपोर्ट करावा असे वाटले.यामुळे तिचे LLB चे अर्धवट शिक्षण तिने पूर्ण केले. खूप कष्ट व जिद्दीने ती वकील झाली. तिच्या मुळे माझ्या विचारात  बदल झाला. स्त्रियांकडे पहायचा दृष्टीकोन बदलला.
        माझी चूक माझा लक्षात आली. एकदा विचार पटला की त्वरित अंबलबजावणी मी करतो. यामुळे तिला सामाजिक असलेली आवड वाढावी म्हणून आम्ही 'जिजाऊ ग्रंथालय ' सुरु केले. आता तर ती खूपच सक्षम झाली  आहे. माझ्यापेक्षा जास्त Practical आहे. तिला सामाजिक प्रश्नांची जाण आहे. तिने तिचे विश्व निर्माण केले आहे.
       मी बदल केला. विचार बदलला. 'स्त्री'चे महत्व संसारात जाणले. यामुळेच मोठे परिवर्तन आमच्यात झाले. म्हणून छोटा बदल केला तर मोठा लाभ होतो. बदल हे जीवनातील महत्वाचे अंग आहे. 

                                                                                                                         (ज्ञानेश्वर मोळक)

Tuesday, 8 November 2011

Mulansathi...

मुलांसाठी ...

        घरातील लहानमुलांच्या बाबतीत काही पथ्ये पाळली पाहिजेत. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादले नाही पाहिजे. नेमके उलटे केले जाते. आईवडिलांच्या इच्छा अकांशांचे ओझे घेऊन मुले वाढत असतात. तसे शाळेचे दप्तर, त्याचे ओझे हे पाठीवर असते. ते दिसते.पालकांचे ओझे मानसिक असते. त्याचा परिणाम मुलांवर खरोखर होत असतो. मुलांचा कल पाहून त्याला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. त्याची आवड वाढीस लागण्यासाठी आपण 'सवड' काढली पाहिजे. जीवनात यशस्वी होणे म्हणजे पहिला नंबरच येणे हे नाही. हे आपण समजून घेतले पाहिजे. नुसताच अभ्यास कर अभ्यास कर असे मागे लागण्यापेक्षा तो कसा करावा त्यासाठी कोणते तंत्र वापरावे. कोणत्याही धार्मिक मंत्राने प्रगती होणार नाही. शास्त्रशुद्ध तंत्र  आपण समजून घेऊन त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला पाहिजे. प्रसंगी आपण अभ्यास केला पाहिजे. त्यांना समजावून दिले पाहिजे.
         हे मी केले आहे. स्वतःवर सन  १९८० साली मी दहावीत असताना, मी स्वतः  एक स्वअभ्यासाचे तंत्र शोधले. वापरले. मला यश  मिळाले. तोच प्रयोग मी माझी  दोन मुले शैलेश व प्रज्ञेश बाबतीत केला. त्यांच्यात  सुधारणा झाली.  त्यांची टक्केवारी १०-१५% टक्क्यांनी वाढली. प्रत्येकाला एकच पद्धती लागू पडत नाही. पण आपण स्वतःसाठी एक पद्धत ठरवू शकतो. ती वापरू शकतो. हमखास यश मिळतेच.
        मा.आ.दीपक पायगुडे यांची फुलगावला सैनिकी शाळा सुरु केली. मला वाटत होते प्रज्ञेशने तेथे जावे. पण तो तयार नव्हता. यामुळे मी आग्रह केला नाही. एकदा सहज कुटुंबासोबत तुळापुरला गेलो. माझे ते आवडते ठिकाण आहे. तेथून फुलगाव जवळच आहे. म्हटल  यावं सैनिकी शाळा पाहून. शैलेश व प्रज्ञेश बरोबर होते. आम्ही संपूर्ण शाळा फिरून पहिली. तेथील नियम व इतर माहिती घेतली परत आलो. तरी सुद्धा प्रज्ञेश तयार  झाला नाही. नंतर मध्यंतरी पुन्हा एकदा शाळेला त्याच्याबरोबर  भेट दिली. जवळपास एक वर्षाने त्याने होकार दिला. तो स्वतःहून म्हटला  मला सैनिकी शाळेत जायचे. त्याचा मनाची तयारी झाली. अत्यंत आनंद झाला. आम्ही प्रज्ञेश ला तेथे प्रवेश घेतला. दोन वर्षे घरापासून दूर तो तेथे राहिला, शिकला. तेथील वातावरण खूपच चांगले आहे. निसर्ग उत्तम आहे. दोन वर्षे प्रज्ञेशने व आम्ही आनंदाने घालवली . त्याचा आयुष्यातील  तो एक चांगला काळ होता असे मला वाटते.
        मला सांगायचे आहे की तुम्ही मुलाला योग्य पद्धतीने सांगितले, समजावून दिले, तर ती तयार होतात. आनंदाने स्वीकारतात. आणि मनापासून कोणतीही गोष्ट करतात. पहा विचार करून...!!

                                                                                  (ज्ञानेश्वर मोळक)

Thursday, 3 November 2011

Vichar Kara...

विचार करा ...

          मला एक गोष्ट आठवते. माझा मुलगा शैलेश याचा पहिला वाढदिवस मोठ्या स्वरुपात साजरा करायचा हे आम्ही ठरवले. विश्रांतवाडीत राहायला येऊन पाचसहाच महिने झाले होते. यासाठी नातेवाईक, मित्रमंडळीना घरी बोलवावे, एक जेवण द्यावे ही इच्छा होती. पत्रिका छापल्या. त्या वाटल्या. सर्व तयारी केली. शैलेशची जन्मतारीख २१ सप्टेंबर १९९० आहे. पहिला वाढदिवस २१ सप्टेंबर १९९१.
          सर्व तयारी झाली. काही खरेदी सुरु झाली. लहान मुल असले तरी आईवडिलांना हौस खूपच असते. तशी आम्हाला होतीच. आम्ही त्याला चांगला ड्रेस घ्यावा म्हणून खरेदीला पुण्यात गेलो. खरेदीला गेलो त्याच दिवशी बाजीराव रस्त्यावर प्रभात सिनेमाजवळ एका नवीन दुकानाचे उद्घाटन झाले होते. आम्ही म्हंटल चांगली संधी आहे. चला आज येथेच खरेदी करू. एका वर्षाच्या मुलाचे कपडे आम्ही पाहात होती. त्यांच्या किंमती ऐकत होते. मन काही ते खरेदीला तयार होत नव्हते. पहिलाच  वाढदिवस खर विचार करायला नको होता. पैशाचा प्रश्न नव्हता. पण मी आणि पत्नीने विचार केला एवढे १०००-१२०० रु  चे कपडे  घ्यायचे तो किती दिवस घालणार. कारण मुले वाढत असतात. वाढत्या वयाबरोबर कपडे अपरे होतात. महागाचे कपडे घेऊन वाया जातात. बर ते कपडे जवळच्या नातेवाईकांना दिले तर राग येतो. यामुळे आम्ही दोघांनी शैलेश सह दुकानातून काढता पाय घेतला. सरळ आळंदीला गेलो. तेथे कपडे पाहिले. पुण्यापेक्षा कितीतरी स्वस्त व सुंदर होते. नक्की आठवत नाही पण ३००-३५० रु चा ड्रेस घेतला. ठरवून टाकले मुले मोठे होई पर्यंत पुण्याला त्यांच्यासाठी खरेदीला जायचे नाही.
          आम्ही १०-१५ वर्ष हे तत्व पाळले. आजही मला लहान मुलांसाठी वारेमाप खर्च करणारे पालक पाहिले की आश्चर्य वाटते. मुलांचा हट्ट आपली हौस जरी खरे असले तरी वास्तव आणि गरज आपण पाहिली पाहिजे. आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे कपडे ८-१० वर्षे आळंदीत व नंतर विश्रांतवाडीत खरेदी करीत गेलो. मुलांचा आनंद काही कमी होत नाही. चांगले कपडे पुण्यापेक्षा जवळ आपल्या परिसरात मिळतात. आपण ते घेत नाही. गोष्ट छोटीच आहे, पण आशय मोठा आहे. आम्ही पती पत्नींनी  अशा अनेक गोष्टी जीवनामध्ये अंगीकारल्या  आहेत.  आपणही विचार करा.

                                                                                  (ज्ञानेश्वर मोळक) 

Wednesday, 2 November 2011

CHALA SURUVAT KARU YA.

चला  सुरुवात  करू  या .


         “घडवू  आपण  आपल्याला ” याची  सुरुवात  कोणत्याही  वयात   सुरु  करता  येईल . याबाबत  मी  माहिती  देणारच  आहे . मला  माझे  अनुभव  आपल्यालासंगून   हे  पटवून  द्यायचे  आहे . अनेक  दिवस  मनात  घोळत  असलेला  विचार  प्रथम  मांडावा  ही  इच्छा  आहे .
         आपण  सर्वांनी  याची  सुरुवात  स्वतापासून  करावी . हाच  मंत्र  घरातील  प्रत्येकाला  द्यावा . याही  पेक्षा  घरातील लहान  मुलांवर  जास्त  लक्ष  केंद्रित  करावे . मला  नेहमी  वाटते , मुलांचे  शिक्षण  चालू  असतानाच  त्यांना  त्यांचा  क्षमतांची  जाणीव  करून  देणे  गरजेचे  आहे . सद्याच्या  धावपळीच्या  जगात  वेळ  नाही ही  सबब  सारेच  सांगतात  पण  धावायचे  कोणी  थांबत  नाही . लग्न  संसार  करतातच  ना . यातून  येणारे  कुटुंब . त्यांची  सुख -दुख  व  जबाबदाऱ्या  खूप  महत्वाच्या  आहेत . जीवनातील  अनेक  क्षण  आपण  आपल्या  प्रिय  कुटुंबाबरोबर  घालवत  असतो . कुटुंबातील  प्रत्येक  सदस्याला  वेळ  देतो . कुटुंबाचा  मूळ  आधार  काय  असेल  तर  तो  “सुसंवाद ” आहे . याकडे  आपण  पाहूच .
मुला -मुलीना  आपण लहानपणापासून  शिकवतो  . तू  मुलगा  आहे . तू  मुलगी  आहे . खरतर  शारीरिक  बदल  त्यांच्यामध्ये  घडेपर्यंत  काहीच फरक  नसतो . तरीसुद्धा  आपणच  त्यांना  सतत  जाणीव  करून  देत  असतो  व  नकळत  संस्कार  करीत  असतो . तू  मुलगी  आहे , असेच  वागायचे . तो  मुलगा  आहे  तो  असेच  वागणार  हे  आपण  गृहीत  धरतो . तशी  मानसिकता  बनवितो . वागतो .  तसे  इतरांना  करायला  लावतो . येथेच  आपण  पहिली  चूक  करतो . मुलगा  किवा   मुलगी  असा  भेद  न करता  “माणूस ” म्हणून  एक  व्यक्ती  म्हणून  विकसित  होवू  देणे  गरजेचे  आहे . यामुळे  लैंगिक  आकर्षण  कमी  होईल . पुढे  होणारे  अत्याचार  कमी  होतील . हल्ली  बाजारात  अनेक  पुस्तके  उपलब्ध  आहेत . वाचनाची  आवड  कमी  व  गरोदर  काळात  वाचली  जातात  ती  धार्मिक  पुस्तके . हजारो  वर्षे  “धार्मिक  गुलामगिरी  आपल्या  मानगुटीवर  बसलेली  आहे . ती  सहजासहजी  लगेच  जाणार  का ? तर  नाही . जर  ती  माझ्या  डोक्यातच  आहे . काय  योग्य  व  अयोग्य  हे  कळायला  लागल्यावर  तरी  माणसाने  बदलले  पाहिजे . बदलेल  तो  माणूस  कसला . यासाठीच  द्यावयाचा  आहे  मंत्र ”घडवू  आपण  आपल्याला ”.
मुलामुलींना स्वतंत्र  विचाराने  धार्मिक  गुलामगिरीत  न अडकता  विकसित  केले  पाहिजे .विज्ञान  व  मानसशास्त्राने   संशोधन  करून  खूपच  प्रगती  केलेली  आहे .ती  आपण  समजावून  घेवून  त्याचे  प्रयोग  आपल्या  घरी  केले  पाहिजेत . घरातील  मुलांचे   आदर्श  कोण ? त्याचे  पहिले  गुरु  कोण ? आपण  असतो . आपण  जे  करतो  तेच  ते  बरोबर  समजतात. तसाच  ते  विचार  करतात. तसेच   वागतात. यामुळे  आपणच  कसे   चुकणार  नाही  हे  पहिले  ठरविले  पाहिजे . जे  मुलांनी  केले  नाही  पाहिजे  वाटते  ते  आपण  करायला  नको . ज्यांची  गरज  आहे  ते  केले  पाहिजे . आजूबाजूला  घडणाऱ्या  घटनांची  वास्तव  व  खरी  माहिती  दिली  पाहिजे . कावला , बागुलबुवा , भूत  अंधार , भीती  यापासून  त्यांना  दूर  ठेवले  पाहिजे . त्याला  काय  कळते  म्हणून  तुम्ही  वेळ  मारून  नेता , तेथेच  चुकता . म्हणून  मी  म्हणतो  चला  सुरुवात  करू   आजच ! वेळ  गेलेली  नाही . आपण  सुरुवात  करू  तोच  चांगला  मुहूर्त  समजा .  

                                                                                         (ज्ञानेश्वर मोळक )
                                                                                                                                                                                                                                 

Tuesday, 1 November 2011

Ghadvu Apan Aplyala "Number One"

 घडवू आपण आपल्याला "नंबर वन"

         मी माझा ब्लोग आजपासून सुरु करीत आहे. आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मां. जिजाऊसाहेब व छत्रपती शिवराय यांचामुळे मिळालेली आहे. आपणा सर्वांना जय जिजाऊ!! जय शिवराय !!
         आज दिनांक ०१/११/११. या नंतर १० दिवसांनी होईल ११/११/११ व यापूर्वी येऊन गेली आहे. वर्षारंभी ०१/०१/२०११ अशी तारीख ही मला वाटते १०० वर्षांनी येते. हे देण्याचे कारण आहे नंबर १. जगात आकड्यांचा खेळ आहे. माणूस आयुष्यभर आकड्यांचा मेळ घालतो. जगताना प्रत्येकाला वाटते आपण नंबर वन व्हावे. मग कमीच माणसे नंबर वन का होतात ? जगामध्ये एकाच महात्मा फुले, महात्मा गांधी,छत्रपती शिवराय,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर का होतात ? त्यांचानंतर त्यांचा घरातून किंवा इतर घरातून दुसरा त्यांचा सारखा का जन्म घेत नाही. जगाचा पातळीवर अनेक नावे सांगता येतील. इतिहासाची पाने उलघडत गेलो तर सापडेल. विश्वाची निर्मिती, नंतर उत्क्रांती व आत्ताची परिस्थिती, किती बदल झला आहे.
         "नंबर वन " तर एकाच कोणी तरी होणार, पण नंबर वन किंवा त्याचा आसपास आपण पोहचू असे प्रत्येकाने ठरवायला काय हरकत आहे. खरतरं जगा मध्ये एकसारखा दुसरा माणूस नाही. कालच जगाची लोकसंख्या ७०० कोटी झली ही वाढतच राहणार आहे. जग हे कमीच पडणार आहे. तरी सुद्धा प्रत्येक जन "नंबर वन" होऊ शकतो. तो जेथे असेल तेथे जसा असेल तसा. तो घडतो कसा याला खूपच महत्व आहे, असे मला वाटते. "नंबर वन" मी अशा साठी म्हणतो की, जे चांगले, अनुकरणीय, गौरवास्पद आहे ते सारेच यात आले. "माणूस म्हणून येणारी ती भावना, अवगुण गृहीत धरून माणसांना आपण मोठे मानतोच ना ?" मी माझा सारखाच चांगला का नाही होणार याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
        मी कसा घडतो, घडविला जातो, बिघडतो का बिघडवला जातो. ही एक प्रक्रिया आहे. याला 'संस्कार' असा गोंडस नाव आहे. या संस्कारांचे व संस्कृतीचे भूत घेऊन आपण आपले आयुष्य का जगायचे. हा खरा प्रश्न आहे. जशी आजची तारीख १०० वर्षांनी येणार प्रत्येकाचा आयुष शंभर वर्ष नसणार ना. मग जन्मपूर्वी मी कोण होतो? मेल्यानंतर माझे काय होणार? मी कुठे असणार? या निरर्थक प्रश्नात अडकण्यापेक्षा 'जन्म ते मृत्यू' हाच माझा प्रवास तोच माझा जीवनपट. त्यातील बालपण सोडलेतर राहिलेल्या आयुष्याला मीच जबाबदार हे आपण कधी स्वीकारणार.
       मी जेव्हा-जेव्हा माझा विचार करतो. मागे वळून पाहतो. तेव्हा-तेव्हा मी स्वीकारलेले बदल, नवीन केलेले उपक्रम याचा आनंद मिळतो. माझ्या घरचे गमतीने म्हणतात 'मी एक प्रयोगशाळा आहे'. होय खरंच आहे. जे पटते ते स्वीकारण्यापूर्वीची मानसिकता हवी. मी स्वतःला सामान्यच मानतो. पण मारताना मी 'असामान्य' असणार आहे. कारण मीच "नंबर वन" राहणार आहे.
      तर यासाठी करायचे काय? हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. तर उत्तर सोपे आहे. 'घडवू आपण आपल्याला' हा याचा मंत्र आहे. मुलांना कळायला लागल्यापासून हा द्या. त्याला स्वःतालाच घडवू द्या. पण कसे घडायचे हे मात्र सांगा भय,भीती व दडपण यातून बाहेर पडून मीच माझा जीवनाचा विकास करू शकतो. जगातील कोणतीही बहयाशक्ती अज्ञात शक्ती माझावर प्रभाव पाडू शकत नाही. हा आत्मा विश्वास त्याला द्या. मी,माझी अंतर्गत शक्ती ठरवू शकते मी कोणे ? मी कसा घडणार? मीच 'नंबर वन' होणार.

                                                                                                                                 ( ज्ञानेश्वर मोळक )