Tuesday, 1 November 2011

Ghadvu Apan Aplyala "Number One"

 घडवू आपण आपल्याला "नंबर वन"

         मी माझा ब्लोग आजपासून सुरु करीत आहे. आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मां. जिजाऊसाहेब व छत्रपती शिवराय यांचामुळे मिळालेली आहे. आपणा सर्वांना जय जिजाऊ!! जय शिवराय !!
         आज दिनांक ०१/११/११. या नंतर १० दिवसांनी होईल ११/११/११ व यापूर्वी येऊन गेली आहे. वर्षारंभी ०१/०१/२०११ अशी तारीख ही मला वाटते १०० वर्षांनी येते. हे देण्याचे कारण आहे नंबर १. जगात आकड्यांचा खेळ आहे. माणूस आयुष्यभर आकड्यांचा मेळ घालतो. जगताना प्रत्येकाला वाटते आपण नंबर वन व्हावे. मग कमीच माणसे नंबर वन का होतात ? जगामध्ये एकाच महात्मा फुले, महात्मा गांधी,छत्रपती शिवराय,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर का होतात ? त्यांचानंतर त्यांचा घरातून किंवा इतर घरातून दुसरा त्यांचा सारखा का जन्म घेत नाही. जगाचा पातळीवर अनेक नावे सांगता येतील. इतिहासाची पाने उलघडत गेलो तर सापडेल. विश्वाची निर्मिती, नंतर उत्क्रांती व आत्ताची परिस्थिती, किती बदल झला आहे.
         "नंबर वन " तर एकाच कोणी तरी होणार, पण नंबर वन किंवा त्याचा आसपास आपण पोहचू असे प्रत्येकाने ठरवायला काय हरकत आहे. खरतरं जगा मध्ये एकसारखा दुसरा माणूस नाही. कालच जगाची लोकसंख्या ७०० कोटी झली ही वाढतच राहणार आहे. जग हे कमीच पडणार आहे. तरी सुद्धा प्रत्येक जन "नंबर वन" होऊ शकतो. तो जेथे असेल तेथे जसा असेल तसा. तो घडतो कसा याला खूपच महत्व आहे, असे मला वाटते. "नंबर वन" मी अशा साठी म्हणतो की, जे चांगले, अनुकरणीय, गौरवास्पद आहे ते सारेच यात आले. "माणूस म्हणून येणारी ती भावना, अवगुण गृहीत धरून माणसांना आपण मोठे मानतोच ना ?" मी माझा सारखाच चांगला का नाही होणार याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
        मी कसा घडतो, घडविला जातो, बिघडतो का बिघडवला जातो. ही एक प्रक्रिया आहे. याला 'संस्कार' असा गोंडस नाव आहे. या संस्कारांचे व संस्कृतीचे भूत घेऊन आपण आपले आयुष्य का जगायचे. हा खरा प्रश्न आहे. जशी आजची तारीख १०० वर्षांनी येणार प्रत्येकाचा आयुष शंभर वर्ष नसणार ना. मग जन्मपूर्वी मी कोण होतो? मेल्यानंतर माझे काय होणार? मी कुठे असणार? या निरर्थक प्रश्नात अडकण्यापेक्षा 'जन्म ते मृत्यू' हाच माझा प्रवास तोच माझा जीवनपट. त्यातील बालपण सोडलेतर राहिलेल्या आयुष्याला मीच जबाबदार हे आपण कधी स्वीकारणार.
       मी जेव्हा-जेव्हा माझा विचार करतो. मागे वळून पाहतो. तेव्हा-तेव्हा मी स्वीकारलेले बदल, नवीन केलेले उपक्रम याचा आनंद मिळतो. माझ्या घरचे गमतीने म्हणतात 'मी एक प्रयोगशाळा आहे'. होय खरंच आहे. जे पटते ते स्वीकारण्यापूर्वीची मानसिकता हवी. मी स्वतःला सामान्यच मानतो. पण मारताना मी 'असामान्य' असणार आहे. कारण मीच "नंबर वन" राहणार आहे.
      तर यासाठी करायचे काय? हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. तर उत्तर सोपे आहे. 'घडवू आपण आपल्याला' हा याचा मंत्र आहे. मुलांना कळायला लागल्यापासून हा द्या. त्याला स्वःतालाच घडवू द्या. पण कसे घडायचे हे मात्र सांगा भय,भीती व दडपण यातून बाहेर पडून मीच माझा जीवनाचा विकास करू शकतो. जगातील कोणतीही बहयाशक्ती अज्ञात शक्ती माझावर प्रभाव पाडू शकत नाही. हा आत्मा विश्वास त्याला द्या. मी,माझी अंतर्गत शक्ती ठरवू शकते मी कोणे ? मी कसा घडणार? मीच 'नंबर वन' होणार.

                                                                                                                                 ( ज्ञानेश्वर मोळक )

1 comment: