चला सुरुवात करू या .
“घडवू आपण आपल्याला ” याची सुरुवात कोणत्याही वयात सुरु करता येईल . याबाबत मी माहिती देणारच आहे . मला माझे अनुभव आपल्यालासंगून हे पटवून द्यायचे आहे . अनेक दिवस मनात घोळत असलेला विचार प्रथम मांडावा ही इच्छा आहे .
आपण सर्वांनी याची सुरुवात स्वतापासून करावी . हाच मंत्र घरातील प्रत्येकाला द्यावा . याही पेक्षा घरातील लहान मुलांवर जास्त लक्ष केंद्रित करावे . मला नेहमी वाटते , मुलांचे शिक्षण चालू असतानाच त्यांना त्यांचा क्षमतांची जाणीव करून देणे गरजेचे आहे . सद्याच्या धावपळीच्या जगात वेळ नाही ही सबब सारेच सांगतात पण धावायचे कोणी थांबत नाही . लग्न संसार करतातच ना . यातून येणारे कुटुंब . त्यांची सुख -दुख व जबाबदाऱ्या खूप महत्वाच्या आहेत . जीवनातील अनेक क्षण आपण आपल्या प्रिय कुटुंबाबरोबर घालवत असतो . कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वेळ देतो . कुटुंबाचा मूळ आधार काय असेल तर तो “सुसंवाद ” आहे . याकडे आपण पाहूच .
मुला -मुलीना आपण लहानपणापासून शिकवतो . तू मुलगा आहे . तू मुलगी आहे . खरतर शारीरिक बदल त्यांच्यामध्ये घडेपर्यंत काहीच फरक नसतो . तरीसुद्धा आपणच त्यांना सतत जाणीव करून देत असतो व नकळत संस्कार करीत असतो . तू मुलगी आहे , असेच वागायचे . तो मुलगा आहे तो असेच वागणार हे आपण गृहीत धरतो . तशी मानसिकता बनवितो . वागतो . तसे इतरांना करायला लावतो . येथेच आपण पहिली चूक करतो . मुलगा किवा मुलगी असा भेद न करता “माणूस ” म्हणून एक व्यक्ती म्हणून विकसित होवू देणे गरजेचे आहे . यामुळे लैंगिक आकर्षण कमी होईल . पुढे होणारे अत्याचार कमी होतील . हल्ली बाजारात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत . वाचनाची आवड कमी व गरोदर काळात वाचली जातात ती धार्मिक पुस्तके . हजारो वर्षे “धार्मिक गुलामगिरी आपल्या मानगुटीवर बसलेली आहे . ती सहजासहजी लगेच जाणार का ? तर नाही . जर ती माझ्या डोक्यातच आहे . काय योग्य व अयोग्य हे कळायला लागल्यावर तरी माणसाने बदलले पाहिजे . बदलेल तो माणूस कसला . यासाठीच द्यावयाचा आहे मंत्र ”घडवू आपण आपल्याला ”.
मुलामुलींना स्वतंत्र विचाराने धार्मिक गुलामगिरीत न अडकता विकसित केले पाहिजे .विज्ञान व मानसशास्त्राने संशोधन करून खूपच प्रगती केलेली आहे .ती आपण समजावून घेवून त्याचे प्रयोग आपल्या घरी केले पाहिजेत . घरातील मुलांचे आदर्श कोण ? त्याचे पहिले गुरु कोण ? आपण असतो . आपण जे करतो तेच ते बरोबर समजतात. तसाच ते विचार करतात. तसेच वागतात. यामुळे आपणच कसे चुकणार नाही हे पहिले ठरविले पाहिजे . जे मुलांनी केले नाही पाहिजे वाटते ते आपण करायला नको . ज्यांची गरज आहे ते केले पाहिजे . आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची वास्तव व खरी माहिती दिली पाहिजे . कावला , बागुलबुवा , भूत अंधार , भीती यापासून त्यांना दूर ठेवले पाहिजे . त्याला काय कळते म्हणून तुम्ही वेळ मारून नेता , तेथेच चुकता . म्हणून मी म्हणतो चला सुरुवात करू आजच ! वेळ गेलेली नाही . आपण सुरुवात करू तोच चांगला मुहूर्त समजा .
(ज्ञानेश्वर मोळक )
No comments:
Post a Comment