Tuesday, 8 November 2011

Mulansathi...

मुलांसाठी ...

        घरातील लहानमुलांच्या बाबतीत काही पथ्ये पाळली पाहिजेत. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादले नाही पाहिजे. नेमके उलटे केले जाते. आईवडिलांच्या इच्छा अकांशांचे ओझे घेऊन मुले वाढत असतात. तसे शाळेचे दप्तर, त्याचे ओझे हे पाठीवर असते. ते दिसते.पालकांचे ओझे मानसिक असते. त्याचा परिणाम मुलांवर खरोखर होत असतो. मुलांचा कल पाहून त्याला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. त्याची आवड वाढीस लागण्यासाठी आपण 'सवड' काढली पाहिजे. जीवनात यशस्वी होणे म्हणजे पहिला नंबरच येणे हे नाही. हे आपण समजून घेतले पाहिजे. नुसताच अभ्यास कर अभ्यास कर असे मागे लागण्यापेक्षा तो कसा करावा त्यासाठी कोणते तंत्र वापरावे. कोणत्याही धार्मिक मंत्राने प्रगती होणार नाही. शास्त्रशुद्ध तंत्र  आपण समजून घेऊन त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला पाहिजे. प्रसंगी आपण अभ्यास केला पाहिजे. त्यांना समजावून दिले पाहिजे.
         हे मी केले आहे. स्वतःवर सन  १९८० साली मी दहावीत असताना, मी स्वतः  एक स्वअभ्यासाचे तंत्र शोधले. वापरले. मला यश  मिळाले. तोच प्रयोग मी माझी  दोन मुले शैलेश व प्रज्ञेश बाबतीत केला. त्यांच्यात  सुधारणा झाली.  त्यांची टक्केवारी १०-१५% टक्क्यांनी वाढली. प्रत्येकाला एकच पद्धती लागू पडत नाही. पण आपण स्वतःसाठी एक पद्धत ठरवू शकतो. ती वापरू शकतो. हमखास यश मिळतेच.
        मा.आ.दीपक पायगुडे यांची फुलगावला सैनिकी शाळा सुरु केली. मला वाटत होते प्रज्ञेशने तेथे जावे. पण तो तयार नव्हता. यामुळे मी आग्रह केला नाही. एकदा सहज कुटुंबासोबत तुळापुरला गेलो. माझे ते आवडते ठिकाण आहे. तेथून फुलगाव जवळच आहे. म्हटल  यावं सैनिकी शाळा पाहून. शैलेश व प्रज्ञेश बरोबर होते. आम्ही संपूर्ण शाळा फिरून पहिली. तेथील नियम व इतर माहिती घेतली परत आलो. तरी सुद्धा प्रज्ञेश तयार  झाला नाही. नंतर मध्यंतरी पुन्हा एकदा शाळेला त्याच्याबरोबर  भेट दिली. जवळपास एक वर्षाने त्याने होकार दिला. तो स्वतःहून म्हटला  मला सैनिकी शाळेत जायचे. त्याचा मनाची तयारी झाली. अत्यंत आनंद झाला. आम्ही प्रज्ञेश ला तेथे प्रवेश घेतला. दोन वर्षे घरापासून दूर तो तेथे राहिला, शिकला. तेथील वातावरण खूपच चांगले आहे. निसर्ग उत्तम आहे. दोन वर्षे प्रज्ञेशने व आम्ही आनंदाने घालवली . त्याचा आयुष्यातील  तो एक चांगला काळ होता असे मला वाटते.
        मला सांगायचे आहे की तुम्ही मुलाला योग्य पद्धतीने सांगितले, समजावून दिले, तर ती तयार होतात. आनंदाने स्वीकारतात. आणि मनापासून कोणतीही गोष्ट करतात. पहा विचार करून...!!

                                                                                  (ज्ञानेश्वर मोळक)

1 comment: